Jalna Maratha Andolan : जालन्यातील परिस्थितीला प्रशासनच जबाबदार – राज ठाकरे

54
Jalna Maratha Andolan : जालन्यातील परिस्थितीला प्रशासनच जबाबदार - राज ठाकरे

जालन्यातील मराठा आंदोलनाने (Jalna Maratha Andolan) सध्या हिंसक वळण घेतलं आहे. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीट करत तीव्र शब्दात निषेध केला आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी (Jalna Maratha Andolan) जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी खात्रीने सांगतो आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसेल. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं, असे म्हणत राज ठाकरेंनी निषेध नोंदवला आहे. तसेच काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : सर्वच मार्गांवर बस बंद; जालना, बीड जिल्ह्यात बंदची हाक)

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

जालन्यातील घटना अतिशय दुर्दैवी (Jalna Maratha Andolan) असून या घटनेचा निषेध नोंदवतो. मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं मोर्चे यांचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. ही पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? याची माहिती पोलिसांच्या अहवालात येईलच पण मी खात्रीने सांगतो की,पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.

जालन्याच्या घटनेला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार

राज ठाकरे यांनी जालनाच्या आंदोलनानंतर (Jalna Maratha Andolan) प्रशासन आणि सध्याची राजकीय परिस्थिती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जालन्यात काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं,यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.