जगदंबिका पाल धमकी प्रकरण; JPC तील विरोधी पक्षांच्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई?

119
जगदंबिका पाल धमकी प्रकरण; JPC तील विरोधी पक्षांच्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई?

संसदेच्या संयुक्ती समितीतील (JPC) विरोधी पक्षांच्या खासदारांनी जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी धमकी दिली आहे. भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात धमकी दिल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी जेपीसी नेमली आहे. भाजपाचे जगदंबिका पाल याचे अध्यक्ष आहेत आणि लोकसभा तसेच राज्यसभेतील सर्वपक्षीय खासदार जेपीसीचे सदस्य आहेत. जेपीसी सध्या देशभरात विविध राज्यांतील विविध घटकांशी चर्चा करून लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यात मुस्लिम संस्थांचाही समावेश आहे.

जेपीसीने (JPC) १४ ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अन्वर मणिपाडी यांना कर्नाटकमधील जमीन घोटाळ्याबाबत मत जाणून घेण्यासाठी बोलाविले होते. यावेळी विरोधी खासदारांनी असंसदीय भाषेचा उपयोग करीत पाल यांना धमकाविले, असा आरोप तेजस्वी सूर्या यांनी ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात केला असल्याचे वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केले आहे.

(हेही वाचा – भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता )

तेजस्वी सूर्या यांनी पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल आणि पॅनेलच्या बैठकीदरम्यान समितीला धमकावले आहे. विरोधकांनी कामकाजात अडथळा निर्माण केला आणि जेपीसी अध्यक्षांना मौखिक धमकी दिली. एवढेच नव्हे तर, त्यांनी समितीचे कागदपत्रे हिसकावली आणि फाडून टाकली. जेपीसीचे (JPC) अध्यक्ष आणि आपला जवाब नोंदविण्यासाठी आलेले सदस्य ज्या ठिकाणी बसले होते तेथे विरोधी पक्षांचे खासदार गेले आणि त्यांनी दोघांनाही धमकी दिली. यावेळी तयार केलेली नोट आणि कागदपत्रे हिसकावली आणि फाडून टाकली.

तेजस्वी सूर्या यांनी आरोप केला की, विरोधी पक्षांचे खासदार बैठकीतील अन्य सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करत मीटिंगमधून बाहेर निघाले. या सर्व खासदारांवर आचरण आणि संसदीय शिष्टाचार नियमांनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी सूर्या यांनी पत्रात केली आहे. यामुळे या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. मणिपड्डी यांनी त्यांच्या कार्यकाळात २०१२ मध्ये सादर केलेल्या अहवालावर चर्चा केली. यात त्यांनी अंदाजे २,००० एकर वक्फ जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असल्याचे आणि त्यातील काही जागा विकली गेली असल्याचे सांगितले, असेही सूर्या यांनी पत्रात म्हटले आहे. (JPC)

(हेही वाचा – Congress पळपुटी; ट्विट डिलीट करत काढला पळ)

वक्फ बोर्ड म्हणजे काय?

मुस्लीम समाजाच्या जमिनींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली. वक्फ म्हणजे ‘अल्लाहच्या नावावर’. अशा जमिनी ज्या कोणत्याही संस्थेच्या नावावर नाहीत. वक्फ बोर्डाचे सर्वेक्षकही असतो. हा सर्वेक्षक ठरवितो की कोणती मालमत्ता वक्फची आहे आणि कोणती नाही.

जर एखाद्याने आपली मालमत्ता वक्फच्या नावावर हस्तांतरित केली असेल, जर कोणी मुस्लिम किंवा मुस्लिम संघटना या जमिनीचा दीर्घकाळ वापर करत असेल किंवा सर्वेक्षणात ही जमीन वक्फ मालमत्ता असल्याचे सिद्ध झाले असेल तर ती जागा वक्फ बोर्डाची मानली जाते. (JPC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.