Caste Census By Congress : काँग्रेसचा जातीनिहाय जनगणनेचा फुगा फुटला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्या राष्ट्र पातळीवर रेटून लावला होता.

21
Caste Census By Congress : काँग्रेसचा जातीनिहाय जनगणनेचा फुगा फुटला?
Caste Census By Congress : काँग्रेसचा जातीनिहाय जनगणनेचा फुगा फुटला?
  • वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्या राष्ट्र पातळीवर रेटून लावला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या प्रचारातून जातीनिहाय जनगणनेचा मुद्या कुठे गायब झाला? हे कळेनासे झाले आहे. (Caste Census By Congress)

सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगतदार वळणावर पोहचला आहे. सर्व पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखविले जात आहेत. परंतु, राहुल गांधी यांच्या ब्रम्हास्त्राला जंग लागला की काय? असा प्रश्न काँग्रेसचा निवडणुकीचा प्रचार बघितल्यानंतर पडला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राहुल गांधी जातीनिहाय जनगणनेच्या घोड्यावर स्वार झाले आहेत. देशात काँग्रेसचे सरकार आले तर आमचे सरकार जातीनिहाय जनगणना करेल असे आश्वासन ते देशातील जनतेला देऊ लागले आहेत. (Caste Census By Congress)

(हेही वाचा – Cash For Query Row : महुआ मोईत्रा यांनी आचार समितीपुढे हजर होण्यासाठी मागितला वेळ)

परंतु, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या प्रचारातून जातीनिहाय जनगणनेचा मुद्या गायब झाला असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचा प्रचार करताना काँग्रेस पक्ष जातीनिहाय जनगणनेचे साधे नाव सुध्दा घेताना दिसत नाही आहे. यामुळे, राहुल गांधी यांचा घोडा चिखलात फसला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Caste Census By Congress)

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केलेल्या जातीनिहाय आकडेवारीचा परिणाम काय परिणाम झाला? हे पाच राज्यांच्या निकालातून पुढे येणार आहे. हिंदी भाषीक राज्यांमध्ये जातीचे राजकारण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. शिवाय, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत मागासवर्गीय मतदारांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. सत्तेची किल्ली याच मतदारांच्या हाती असते हेही विसरून चालणार नाही. असे असताना काँग्रेस पक्ष जातीनिहाय आकडेवारीचा मुद्या प्रचारात का उचलत नाही आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Caste Census By Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.