new parliament building inauguration : नवीन संसद भवन स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करणारे माध्यम बनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

आज पुन्हा सर्व विश्व भारताच्या संकल्पेच्या दृढतेचा आदर आणि अपेक्षांच्या भावनेने पाहत आहे. जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा विश्व पुढे जात असते. ही नवीन वस्तू भारताच्या विकासाबरोबर विश्वाच्या विकासाचेही आवाहन करेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

64

नवीन संसद भवनाच्या उदघाटनाची आजचा दिनांक इतिहासाच्या पानावर स्वाक्षरी बनेल. आजचा दिवस हा असाच दिवस आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यात भारताच्या जनतेला आपल्या लोकशाहीला नवीन संसद भवनाच्या माध्यमातून भेट मिळाली आहे. ही केवळ एक वास्तू नाही, तर तर १४० कोटी भारतीयाच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. हे लोकशाहीचे मंदिर आहे. संकल्पाला सिद्धीशी जोडणारा सेतू आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करणारे माध्यम बनेल, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवीन वस्तू भारताच्या विकासाबरोबर विश्वाच्या विकासाचेही आवाहन करेल

संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. विकसित भारताच्या संकल्पनांची पूर्तता होताना पाहिले. नवीन रस्त्यावर चालतच नवीन प्रतिमा तयार होते. आज नवीन भारत नवीन रस्ता तयार करत आहे. दिशा नवीन आहे, संकल्प नवीन आहे. आज पुन्हा सर्व विश्व भारताच्या संकल्पेच्या दृढतेचा आदर आणि अपेक्षांच्या भावनेने पाहत आहे. जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा विश्व पुढे जात असते. ही नवीन वस्तू भारताच्या विकासाबरोबर विश्वाच्या विकासाचेही आवाहन करेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : काळानुसार हिंदूंना मार्गदर्शक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर विचार!)

जो थांबतो त्याचे भाग्यही थांबते, जो चालत राहतो त्यांचे भाग्यही पुढे जात असते

काही वेळा पूर्वी संसदेत पवित्र संगोलची स्थापना झाली आहे. कर्तव्यपद, सेवापद, राष्ट्रपदाचे हे प्रतीक मानले जात होते. सत्तांतराचे हे प्रतीक मानले जात होते. तामिळनाडूचे संत यावेळी संसदेत आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. माध्यमांमध्ये याविषयी अधिक माहिती प्रसिद्ध झाली आहे. या पवित्र संगोलची मान मर्यादा आपण पुन्हा प्रदान करू, जेव्हा संसदेत कार्यवाही सुरू होईल तेव्हा हा संगोल आपल्याला प्रेरणा देत राहील. भारत लोकशाहीची जननी आहे. वैश्विक लोकशाहीचा मोठा आधार आहे. ती संस्कार, विचार आणि परंपरा आहे. आपले वेद, महाभारत यातून मार्गदर्शन आपल्याला प्रेरणा मिळते. ही संसद देशाच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते, जो थांबतो त्याचे भाग्यही थांबते, जो चालत राहतो त्यांचे भाग्यही पुढे जात असते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आधीची परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नवीन संसद प्रतीक बनले

गुलामीनंतर आपल्या भारताने नवीन प्रवास सुरु केला होता, तो प्रवास अनेक खडतर मार्गातून स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रवेश करत आहे. हा विकासाचा काळ आहे. देशाला नवीन दिशा देणारा काळ आहे. असंख्य आकांक्षांना पूर्ण करणारा अमृत काळ आहे. भारताच्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी या कार्यस्थळाला तितकेच आधुनिक होण्याची आवश्यक होती. एक काळ होता भारताची संस्कृती, परंपरेचा उद्घोष केला जायचा. पण शेकडो वर्षांच्या गुलामीने हा गौरव हिसकावून घेतला गेला. २१व्या शतकाचा नवीन भारत बुलंद निश्चयाने भरलेला आहे. गुलामीला पाठी टाकून आधीची परंपरा पुन्हा प्रस्थापित करत आहे, त्याचे हे नवीन संसद प्रतीक बनले आहे. यात संस्कृती आणि संविधान आहे. एक भारत श्रेष्ठ भारताचे दर्शन होत आहे. लक्ष्य मोठे आहे आणि कठीण आहे त्यासाठी देशवासियांना नवीन संकल्प घ्यायचा आणि नवीन गती पकडायची आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याने त्यावेळी विश्वातील अनेक देशांमध्ये जागृती निर्माण केली. आपला देश स्वतंत्र झालाच पण तेव्हापासून अन्य देशांची स्वातंत्र्याच्या दिशेनं मार्गक्रमण सुरु केले. अनेक देशांना गरिबीमधून बाहेर पाडण्यासाठी प्रेरणा देणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.