मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार; Eknath Khadse यांचा खुलासा

102
मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार; Eknath Khadse यांचा खुलासा

‘भारतीय जनता पक्षामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे, मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार,’ असे सर्वात मोठे विधान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले. यामुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख सरकते पुढे, मागील अनेक महिन्यांपासून एक तारखेचा मुहूर्तच चुकतो)

राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही. अश्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच फोटो दिसत असल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे नाथाभाऊ नेमके कोणाचे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याबाबत आता स्वतः एकनाथ खडसे यांनी मोठा खुलासा केला असून भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे असे महत्वाचे विधान केले आहे.

(हेही वाचा – आता ‘लाडक्या भावांच्या’ खात्यात सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला पैसे होणार जमा – Minister Mangal Prabhat Lodha)

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये शुभेच्छांचे बॅनर झळकावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे नाथाभाऊ नेमके भाजपाचे की राष्ट्रवादीचे? असा सवाल उपस्थित होता. अशातच आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.