हिंदू मतदान करतील, तर कट्टर हिंदू राजा येईल; Kalicharan Maharaj यांचे हिंदूंना मतदानाचे आवाहन

117
हिंदू मतदान करतील, तर कट्टर हिंदू राजा बसेल; Kalicharan Maharaj यांचे हिंदूंना मतदानाचे आवाहन
हिंदू मतदान करतील, तर कट्टर हिंदू राजा बसेल; Kalicharan Maharaj यांचे हिंदूंना मतदानाचे आवाहन

आपण मतदानासाठी जात नाही, त्यामुळे मुस्लिम धार्जिणे लोक राजा बनू लागले. मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. (Maharashtra Assembly Election 2024) मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू…फुकटात काहीतरी तुकडे टाकायचं असे सर्वच राजकीय पक्ष वापरतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम असतात. पण ज्यांची कातडी सोलली जाते ते हिंदू आहेत. हिंदू लोक मतदानालाच जात नाही, मग राजा कोण येणार, तर मुसलमानाचे पाय चाटणारा…हिंदू मतदान करतील, तर कट्टर हिंदू राजा बसेल, असे परखड प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या प्रचारसभेत कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) बोलत होते.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी जळगांवात तनाव; अपक्ष उमेदवारांच्या घरावर गोळीबार)

या वेळी पुढे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) म्हणाले, काँग्रेस अँड कंपनीकडे मुस्लिमांनी मागणी केली आहे. केंद्र सरकार आणत असलेल्या वफ्फ बोर्ड कायद्यात सुधारणा आणावी, अशी मागणी मुस्लिमांनी केली आहे; परंतु हे हिंदुस्तान आहे, हिंदूच स्थान आहे. जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढसाठी मतदान करताल मग राजा कोण बसणार? हिंदू व्होट बँकांची (Hindu vote bank) क्रांती पाहिजे. 100 टक्के दंगली मुसलमानांकडूनच होतात, अशा शब्दांत कालीचरण महाराज यांनी हिंदूंना मतदानाचे आवाहन केले आहे.

संजय शिरसाट यांच्या विरोधात उबाठा गटाचे राजू शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.