Haryana Assembly Election : कुमारी सेलजा यांना निवडणुकीत काँग्रेसने केले बाजूला

102
Haryana Assembly Election : कुमारी सेलजा यांना निवडणुकीत काँग्रेसने केले बाजूला
  • प्रतिनिधी 

हरियाणा विधानसभा निवडणुकी (Haryana Assembly Election) दरम्यान काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा यांच्या नावाची खूप चर्चा होत आहे. दलित नेत्या कुमारी सेलजा यांना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पूर्णपणे बाजूला केले आहे. आठवडाभरापासूर त्या निवडणूक प्रचारापासून दूर आहेत. सध्या त्या दिल्लीत आराम करत आहेत. अशा स्थितीत आता माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा गटाने हरियाणा निवडणूक प्रचाराची धुरा पूर्णपणे आपल्या हातात घेतली आहे.

राज्यात कुमारी सेलजा आणि हुड्डा असे गट असून त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत. सेलजा यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची होती, पण पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सेलजाही मुख्यमंत्रिपदावर दावा करत होत्या. आता सेलजा हरियाणातील काँग्रेसच्या पोस्टर्समधूनही गायब झाल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पक्षाचे नेते आणि उमेदवारांनी पोस्टरमध्ये सेलजा यांना स्थानच दिले नसल्याचे दिसते आहे. हिसार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या पोस्टरमधून कुमारी सेलजा यांचा फोटो गायब आहे. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – Dharavi Masjid Demolition : मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर जिहादी कारणीभूत; आमदार नीतेश राणेंचा इशारा)

सेलजा यांच्यावर कॉंग्रेसने लावला ‘हा’ आरोप 

गेल्या काही दिवसांपासून त्या राजधानी दिल्लीतच राहत असून निवडणूक प्रचारापासून त्यांनी अंतर ठेवले आहे. दिल्लीतील माध्यमांनी याबाबत सेलजा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. सध्या त्या आपल्या निवासस्थानी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना भेटत असून, काँग्रेस पक्षाने सेलजा यांना सतत बाजूला ठेवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेलजाही दलित समाजाच्या नावाखाली काँग्रेसवर निशाणा साधत आहेत आणि पक्षाने त्यांना बाजूला सारल्याचा आरोप करत आहेत. हांसी, नारनौंड, बरवाला, या उकलाना, आदमपूर आणि नलवा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसने उमेदवारांनी त्यांच्या पोस्टरमध्ये सेलजा यांना स्थान दिलेले नाही. (Haryana Assembly Election)

हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांना या पोस्टर्समध्ये स्थान देण्यात आले आहे. हिसार जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या कुमारी सेलजा त्यांच्या नवी दिल्लीतील साऊथ एव्हेन्यू येथील निवासस्थानी राहत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनीही काँग्रेसमधील या दुहीचा लाभ घेत हुड्डा हे दलितविरोधी आहेत आणि त्यांनी कुमारी सेलजा यांचे काय केले ते पाहा असे बोलण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे माजी मंत्री आणि रोहतकचे उमेदवार मनीष ग्रोवर म्हणाले की, काँग्रेसने कुमारी सेलजा यांना योग्य वागणूक दिली नाही. काही शक्तीशाली लोकांना दलित कन्येला वर येऊ द्यायचे नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सेलजा यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेसचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. सेलजा यांच्या फार कमी समर्थकांना पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. (Haryana Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.