Haryana Assembly Elections : काँग्रेसच्या अडचणीत वाढ

122
Haryana Assembly Elections : काँग्रेसच्या अडचणीत वाढ
  • प्रतिनिधी 

हरियाणा विधानसभा निवडणूक (Haryana Assembly Elections) जवळ आली असल्यामुळे नेते पक्ष बदलण्यात आघाडीवर आहेत. येथील सोनीपतच्या राई मतदारसंघाचे माजी आमदार आणि भूपेंद्र हुड्डा यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेस नेते जयतीर्थ दहिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसच्या अडचणी बऱ्यापैकी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेत्या सेलजा यांच्यामुळे आधीच पक्ष अडचणीत आला असताना हा धक्का काँग्रेसला सहन करावा लागतोय. हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेत्यांकडून पक्ष बदलाच्या हालाचाली सुरू आहेत.

एवढंच नाहीतर जयतीर्थ दहिया यांनी भूपेंद्र हुड्डा यांच्यावर विश्वासघाताचाही आरोप केला आहे आणि पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याशिवाय जयतीर्थ दहिया यांच्या समर्थकांनी काँग्रेसला मत देणार नसल्याचा इशाराही दिला आहे. तसेच काँग्रेसने ज्यांना तिकीट दिले आहे, दहिया यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

(हेही वाचा – Tamilnadu: हिज्ब-उत-तहरीर संघटनेच्या विरोधात एनआयएची ११ ठिकाणी छापेमारी)

हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप

जयतीर्थ दहिया यांनी भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, राई मतदारसंघातून तिकीटाचे वाटप हे देवाण-घेवाणीतून झाले आहे. माजी आमदार दहिया यांनी म्हटले आहे की, मी येथून तिकीटासाठी प्रबळ दावेदार होतो. परंतु काँग्रेसने माझे तिकीट कापून अन्य दुसऱ्याला तिकीट दिलं आहे. यासाठी मी काँग्रेस हायकमांडकडे माझा राजीनामा पाठवला आहे.

जयतीर्थ दहिया हे हरियाणाचे माजी कॅबीनेट मंत्री चौधरी रिजक राम दहिया यांचे पुत्र आहेत. जयतीर्थ दहिया सोनीपतमधील राई विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदारही राहिले आहेत. दहिया हे २०१४ मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता आणि दहिया यांनीही ही निवडणूक जिंकली होती. मात्र यंदा काँग्रेसने सोनीपतच्या राई विधानसभा मतदारसंघातून जय भगवान अंतिल यांना उमेदवारी दिली आहे. येथे त्यांची लढत भाजपाचे उमेदवार कृष्णा गहलावत यांच्याशी असणार आहे. काँग्रेस उमेदवार जय भगवान अंतिल यांनी दावा केला आहे की, त्यांनी सर्व समाजातून समर्थन मिळत आहे आणि ते विजयी होतील. (Haryana Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.