Haryana Assembly Election : भाजपा पुन्हा खासदारांना विधानसभेसाठी रिंगणात उतरविणार?

95
Haryana Assembly Election : भाजपा पुन्हा खासदारांना विधानसभेसाठी रिंगणात उतरविणार?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election) विजयासाठी भारतीय जनता पार्टीने आपले सगळेच राजकीय डावपेच वापरण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ज्या फॉर्म्युल्याच्या आधारावर तिकीटवाटप केले होते तोच फॉर्म्युला आता हरियाणातही वापरला जाण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाने मागच्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांत हा प्रयोग केला होता. यातील तीन राज्यांत भाजपाचे सरकार आले आहे. या चार राज्यांत मिळून पक्षाने २१ खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या (Haryana Assembly Election) रिंगणात उतरवले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी खासदारांना तिकीट देण्यात आले होते. छत्तीसगढमध्ये चार तर तेलंगणात तीन खासदार विधानसभा लढले होते. तेलंगणात पक्षाला फारसा लाभ झाला नाही कारण तीन खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला. २१ पैकी १२ खासदार विधानसभेवर निवडून गेले.

(हेही वाचा – BMC School CCTV Camera : शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनामागे दडलेय काय?)

काँग्रेसकडून मोठे आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या सेटबँकनंतर भाजपा आता प्रत्येक पाउल काळजीपूर्वक उचलते आहे. गेल्या अडीच महिन्यांत मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी पूर्ण हरियाणाचा दौरा करून मोठ्या घोषणा केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या राज्यातील निम्म्या जागा जिंकल्यामुळे आपल्याला काँग्रेसकडून मोठे आव्हान निर्माण झाले असल्याची पक्षाला कल्पना आहे. त्यामुळेच नव्या रणनीती अंतर्गत आपल्या सर्व खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा डाव भाजपाकडून टाकला जाण्याची शक्यता आहे. (Haryana Assembly Election)

भाजपाची रणनीती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने सर्व खासदारांना विधानसभा निवडणूक (Haryana Assembly Election) लढवण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या हरियाणातील सर्वच प्रमुख नेत्यांची गुरुग्राम येथे बैठक झाली होती. तेव्हापासूनच भाजपा आपल्या खासदारांना रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. केवळ एवढेच नाही तर पक्षाचे जे उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत त्यांनाही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.