झारखंडचे माजी मुख्यमंत्री Champai Soren बंडाच्या तयारीत; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

165
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) पक्षात नाराज आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्टद्वारे भावना व्यक्त केल्या. मागील तीन दिवस आपण अपमानास्पद जीवन जगत आहे. तरीही त्यांना खुर्चीची चिंता होती. त्या पक्षात माझे अस्तित्व नाही. त्यामुळे आपल्याला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले आहे. चंपाई सोरेन यांच्या या पोस्टमुळे ते पक्षातून बाहेर पडणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे झारखंडपासून दिल्लीपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सत्ता मिळाल्यावर बाबा तिलका मांझी, भगवान बिरसा मुंडा आणि सिदो-कान्हू यांसारख्या वीरांना आदरांजली अर्पण करून राज्यसेवा करण्याचा संकल्प केला होता, झारखंडच्या प्रत्येक मुलाला माहित आहे की, माझ्या कार्यकाळात राज्याची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. मी कधीही कोणावर अन्याय केला नाही किंवा होऊ दिला नाही. दरम्यान, होळीच्या दुसऱ्या दिवशी, माझे पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम पक्षनेतृत्वाने पुढे ढकलले असल्याचे मला समजले. यामध्ये एक सार्वजनिक कार्यक्रम दुमका येथे होता, तर दुसरा कार्यक्रम पीजीटी शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटपाचा होता. असे विचारले असता, युतीने ३ जुलै रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे, तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम दुसऱ्याने रद्द करून घेण्यापेक्षा लोकशाहीत अपमानास्पद काही असू शकते का?, असा सवालही चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी केला. चंपाई सोरेन यांनी ही भूमिका घेतल्याने ते भाजपासोबत जाऊन सत्ता बदल घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.