Rajya Sabha By-Elections साठी ‘या’ उमेदवारांनी अर्ज केला दाखल

104
Rajya Sabha By-Elections साठी 'या' उमेदवारांनी अर्ज केला दाखल

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी (Rajya Sabha By-Elections) बुधवारी (२१ ऑगस्ट) भाजपाच्या वतीने धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन जागांसाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांमध्ये गोयल यांच्या जागेवर राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय आणखी एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. तर उदयनराजे भोसले यांच्या जागेवर भाजपाच्या धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (Rajya Sabha By-Elections)

(हेही वाचा – बदलापूरच्या घटनेवरुन Raj Thackeray यांचा संताप; सरकारला सुनावले खडे बोल)

या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी (२२ ऑगस्ट) केली जाईल. छाननीत राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरून अन्य तीन हौशी उमेदवारांचे अर्ज बाद ठरणार आहेत. राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट अशी आहे. त्यामुळे या मुदतीनंतर उमेदवारांच्या निवडीची घोषणा केली जाईल. या पोटनिवडणुकीत (Rajya Sabha By-Elections) विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

नितीन पाटील यांना चार वर्षाचा कालावधी मिळणार

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे जुलै २०२२ मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत जुलै २०२८ पर्यंत होती. परंतु, भाजपाने त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीत गोयल निवडून आले. त्यामुळे त्यांच्या जागेवर राज्यसभेवर जाणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्य म्हणून काम करण्यास चार वर्षांचा कालावधी मिळणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यापूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे सदस्य होते. ते एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. त्यामुळे भोसले यांच्या जागेवर राज्यसभेवर जाणाऱ्या भाजपाच्या धैर्यशील पाटील यांना खासदार म्हणून काम करण्यास दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी मिळेल. (Rajya Sabha By-Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.