बहुचर्चित राज्याचा महायुती सरकारचा सत्ता स्थापनेचा (Establishment of power) मुहूर्त अखेर ठरला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची माहिती X वरील पोस्टद्वारे दिली आहे. येत्या ५ डिसेंबर सरकरचा शपथविधी होणार असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
राज्यातील सत्ता स्थापनेचा (Establishment of power) तिढा सुटत नाही. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाची मागणी केली आहे, मात्र देवेंद्र फडणवीस ते सोडण्यास तयार नाहीत. यावरून दोघांकडून ताणाताणी सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चेतून दूर जात थेट गावी साताऱ्यात दरे गावी डेरेदाखल झाले. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा (Establishment of power) आणखी वाढला आहे, अशी चर्चा सुरु झाली असतानाच बावनकुळे यांच्या पोस्टमुळे एकनाथ शिंदे यांचे मन वळवण्यात भाजपाच्या नेतृत्वाला यश आले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे होणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या शपथविधीला स्वतः पतंप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
Join Our WhatsApp Community