Election Affidavit : आदित्य ठाकरे यांची संपत्ती पाच वर्षात ३५ टक्क्यांनी वाढली!

230
Election Affidavit : आदित्य ठाकरे यांची संपत्ती पाच वर्षात ३५ टक्क्यांनी वाढली!
  • सुजित महामुलकर

शिवसेना उबाठा नेते आणि वरळी मतदारसंघातील उबाठा उमेदवार ३४-वर्षीय आदित्य ठाकरे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात जवळपास ३५ टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १६ कोटीपेक्षा अधिकची मालमत्ता जाहीर केली होती. बुधवार २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्यांदा वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Election Affidavit)

(हेही वाचा – आयटीबीपी दल शौर्य आणि समर्पणाचे प्रतिक – PM Narendra Modi)

१६ कोटीवरून २१ कोटी

यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती २०१९ च्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकूण १६ कोटी असलेली आदित्य ठाकरे यांची संपत्ती २१.४७ कोटी इतकी वाढली आहे. (Election Affidavit)

१.९१ कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी, हिरे

२२ ऑक्टोबर २०२४ या दिवसापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे रोख ३७ लाख रुपये असून २.८१ कोटी रुपये विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात आहेत तसेच शेअर्स, म्यूचुअल फंड यात १०.१४ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे १.९१ कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी, हिरे असून एक बीएमडब्ल्यू कार अशी ठाकरे यांची स्वतःची मालमत्ता १५.४३ कोटी दाखवण्यात आली आहे. (Election Affidavit)

(हेही वाचा – Ncp Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई होणार)

पाच भूखंड उद्धव ठाकरे यांच्याकडून भेट

आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बिलवले गावातील ५ शेतजमीन भूखंड वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून भेट मिळाल्याचे नमूद केले आहे. या भूखंडांची किंमत १.४८ कोटी आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील दोन दुकानांची किंमत ३.२१ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. यासह अन्य अचल मालमत्ता मिळून एकत्रित ६ कोटी रुपये किंमत असल्याचे प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. (Election Affidavit)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.