छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीकडून छापेमारी; नऊ ठिकाणी कारवाई सुरु

139

महापालिकेच्या हद्दीत राबवण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाट लॅपटाॅपवरुन टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ईडीकडून आता छत्रपती संभाजीनगरातील 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने शुक्रवारी सकाळीच शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी आधीच शहरातील सिटी चौक पोलिसांत 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ई- निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

( हेही वाचा: CBI ची मोठी कारवाई; पाच सरकारी अधिकाऱ्यांसह दोन खासगी व्यक्तींना अटक )

पाहणी करुन अहवाल सादर करणार 

निविदा घोटाळ्यात अडकलेल्या समरथ कन्स्ट्रक्शन, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांनी संयुक्त भागीदारीमध्ये पुणे परिसरात बांधलेल्या बहुमजली इमारतींची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. ही समिती या कंत्राटदारांनी बांधलेल्या इमारतींची पाहणी करुन अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक डाॅक्टर अभिजित चौधरी यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.