Dharavi: धारावीतील ९० फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली चार ते पाच दिवसांची मुदत!

565

धारावी (Dharavi) येथील ९० फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती.

(हेही वाचा-Dharavi: धारावीत तणाव! मशीदचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसीच्या वाहनांवर हल्ला, अल्पसंख्याकांनी आधीच आखली होती हल्ल्याची योजना )

तथापि, सदर ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे. (Dharavi)

संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटवण्याची लेखी विनंती केल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे. ठरल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आले आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. (Dharavi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.