अमृता फडणवीसांना लाचेची ऑफर देणाऱ्या आरोपी अनिक्षाच्या वडिलाचा ठाकरेंसोबत फोटो

165
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याच्या आरोपांनंतर अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलाने २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केला होता, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानीचा फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनिक्षा जयसिंघानीचा वडील म्हणजे कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याने २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केला होता, असा दावा केला जात आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या फसवणूक प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचाही कुणासोबतचा फोटो दाखवून चर्चित चर्वण करणाऱ्या आणि स्क्रिप्टेड स्टोरी वर काम करणाऱ्या भक्तगणांनी हा फोटो नीट बघून घ्यावा आणि आपल्या सावकाशीने प्रतिक्रिया द्याव्या, असे ट्वीट त्यांनी केले आहे. सोबत अमृता फडणवीस आणि दानिश हिंगोरा यांचा एकत्र फोटो त्यांनी शेअर केला आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या डिझायनरविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. अनिक्षाने एक कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप अमृता फडणवीसांनी केला होता. अमृता फडणवीसांनी पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केला होता. एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिक्षाच्या घरावर छापे टाकत तिला ताब्यात घेतले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.