विधानसभा उमेदवार यादीमध्ये Devendra Fadnavis यांचाच वरचष्मा

170
विधानसभा उमेदवार यादीमध्ये Devendra Fadnavis यांचाच वरचष्मा
  • खास प्रतिनिधी 

महाराष्ट्रात भाजपाच्या विधानसभा उमेदवार यादीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाच वरचष्मा राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

लोकसभेत फटका

गेले दोन दिवस भाजपाच्या प्रसिद्ध न झालेल्या यादीबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यात चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे अशा अनेकांची नावे असल्याच्या बातम्या न्यूज चॅनल वर सुरू झाल्या. असे म्हटले जाते की, लोकसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निश्चित केलेली काही नावे दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी वगळली आणि त्याचा फटका पक्षाला बसला, हे एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.

(हेही वाचा – निज्जर हत्येप्रकरणी Canada चा खोटारडेपणा उघड; संबंध बिघडण्यास ट्रूडोच जबाबदार असल्याचा भारताचा आरोप)

यादी एक-दोन दिवसांत प्रसिद्ध

त्यामुळे आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रमुख जबाबदारी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोपविण्यात आली असून १५०-१६० पैकी जवळपास ११५-१२० नावांवर अंतिम निर्णय झाला आहे. यातील वाद नसलेल्या जागांवरील उमेदवारांची यादी येत्या १-२ दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, अशी शक्यता आहे.

राज्यात पक्षाचा प्रमुख चेहेरा फडणवीस

राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यानंतर प्रभावी नेता जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, हे त्यांचे राजकीय विरोधकही खासगीत मान्य करतात. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई जरी दिसत असली तरी खरी लढाई ही फडणवीस विरुद्ध शरद पवार अशीच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपामध्ये तर फडणवीस यांचा चेहेरा हा मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहेरा म्हणून पाहिला जातो. अर्थात, भाजपा अधिक जागा मिळवून महायुतीची सत्ता आल्यास भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित करेल, हेच खरे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.