“… तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis असं का म्हणाले?

147
"... तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन", उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis असं का म्हणाले?

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना म्हटलं की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत.’ असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करताना मोठ वक्तव्य केलं आहे.

(हेही वाचा –PM Narendra Modi यांच्या हस्ते ३० ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन)

“मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन.” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा –Kolkata Doctor Case : डॉक्टरांना जगू द्या! कोलकाता प्रकरणावर आयएमए अध्यक्षांचे भावनिक पत्र)

“आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी घेतले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. तसेच मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा अयोग्य आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो की, जर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, त्यांना मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यामध्ये मी अडथळा आणला, मी निर्णय होऊ दिला नाही, तर त्याच क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणामधूनही सन्यास घेईल.” असा पलटवार फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.