Devendra Fadnavis : फडणवीसही आता म्हणून लागले, लाव रे तो व्हिडीओ!

170
Devendra Fadnavis : फडणवीसही आता म्हणून लागले, लाव रे तो व्हिडीओ!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत लावले तो व्हिडीओ म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याप्रमाणे यंदांच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणजे व्होट जिहादचा पर्दाफाश केला. उलेमा संघटनेचे प्रमुखांनी केंद्रासह राज्यातही भाजपाचे सरकार स्थापन होऊ नये यासाठी भाजपाविरोधी मतदान करून महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करण्याचे आवाहन केले. एकप्रकारे सामाजिक बहिष्कार घालण्याचे काम या उलेमा संघटनेकडून केले जात असून उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) चे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचे पक्ष जर व्होट जिहादचा नारा देत असतील तर या पक्षांविरोधात आम्ही धर्मयुद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दहिसर येथील सभेत दिला.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : माहीममध्ये उमेदवारांचे कुटुंब रमले प्रचारात)

दहिसरमधील महायुतीच्या उमेदवार आमदार मनिषा चौधरी यांच्या प्रचार सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनिषा ताई तुम्ही चिंता करू नका, अडकलेले प्रकल्प असतील. समोरच्या उमेदवाराने अडकलेले प्रकल्प असतील. ते प्रकल्प माझ्याकडे घेऊन या मी ते प्रत्येक प्रकल्प मी पूर्ण करेन. आणि ज्यांनी प्रकल्प अडकवले, घरांचे पैसे घेतले, लोकांना लुबाडले त्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार असाही इशारा दिला. कोविड काळात मनिषा ताई यांनी केलेले काम अद्भूत असून स्वत:च्या घरचे दु:ख विसरून त्या रस्तयावर उतरल्या. गरीबांना जेवण दिले, खिचडी देण्याचे काम केले, पण दुसरेकडे उबाठा शिवसेनेचे लोक खिचडीचोर होते. याप्रकरणी ते जेलमध्येही गेले होते. कोविड काळात केलेला भ्रष्टाचार मुंबईकर विसरलेले नसून कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते तर कंपाऊंडर काम करत होते. त्यामुळे माणसे मेली, या रुग्णांच्या मृत्यूचा गुन्हा कुणावर नोंदवायचा असा सवाल करत फडणवीस यांनी एका बाजूला काम करणाऱ्या मनिषाताई आणि दुसरीकडे मलिदा खाणारे उबाठाचे नेते.

(हेही वाचा – Mankhurd मध्ये साडे आठ टन चांदीच्या विटा जप्त)

मनिषा ताईंच्या कामाचा गौरव करताना फडणवीस यांनी मनिषा ताईंनी विमानतळाचे रडार हटवण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी लागणारे ४५६ कोटी रुपये आपण भरले आहे आणि त्यामुळे या जागेचा वापर लवकरच जनतेला होईल. यावर थिमपार्क होईल. एकप्रकारे यामाध्यमातून ऑक्सिजन देण्याचे काम होत आहे. रेल्वे हद्दीतील झोपड्या, दहिसर नदीची भिंत, गोपीनाथ मुंडे स्टेडियम असो वा यापूर्वीच्या नेत्यांनी कधीही न केलेल्या ५६ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटच्या कामांना सुरुवात केले. त्यामुळे पुढील ४० वर्षांत येथील रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही असा विश्वास दिला. येथील गणपत पाटील नगरमधील जनतेला या जन्मात कोणतीच सोय मिळाली नसती. पण मनिषाताईंनी मोठा संघर्ष करून, त्याची परवानगी घेऊन तसेच त्यासाठी पैसे भरुन गणपत पाटील नगरच्या नावावर जमिनीची मालकी करून घेतली आहे. ज्यामुळे येथील लोकांना लवकरच स्वत:ची पक्की घरे मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

(हेही वाचा – Sajjad Nomani यांच्या विरोधातील सोमय्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल)

उबाठा शिवसेनेने एक आयकॉनिक प्रकल्प अथवा काम दाखवावे

मुंबई महापालिका ही मागील २५ वर्षे उबाठा शिवसेनेच्या ताब्यात होती, अडीच वर्षे त्यांचे राज्यात सरकार होते. पण त्यांच्यासाठी मुंबई आणि महापालिका ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असून आपले सरकार आल्यानंतर मुंबईचा चेहरा आणि चित्र बदलून दाखवले. अशी आपल्या कामे खूर्प आहे असे सांगत उबाठा शिवसेनेने मुंबईतील एक आयकॉनिक प्रकलप दाखवावा असे आव्हान फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

मुख्यमंत्री आपली बहिण योजनेसह लेक लाडकी, लखपती दिदी यासारख्या योजना राबवल्यानंतर आपले काही सावत्र भाऊ न्यायालयात गेले होते आणि त्यांनी या योजना बंद करण्याचा प्रयत्न केला होता. ते यासाठी न्यायालयात गेले होते. परंतु आपले सख्ये भाऊ, सख्ये मामा मंत्रालयात बसलेले असून आम्ही योजनांबाबत न्यायालयात बाजू मांडल्यानंतर त्यांनी या योजना सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) या पक्षातील आपले सावत्र भावांनी ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या आणि सख्ख्या बहिणीला निवडून द्या आणि सावत्र भावांना घरी बसवा असे आवाहन फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.