काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडघरचे आवताण; Devendra Fadnavis यांचे मविआवर टीकास्त्र

74
काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडघरचे आवताण; Devendra Fadnavis यांचे मविआवर टीकास्त्र
काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडघरचे आवताण; Devendra Fadnavis यांचे मविआवर टीकास्त्र

काँग्रेसची (congress) आश्वासने म्हणजे लबाडघरचे आवताण आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे. आमगाव- देवरी विधानसभेचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. दि. ११ नोव्हेंबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये त्यांची सभा पार पडली. (Devendra Fadnavis)

( हेही वाचा : Delhi Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलाला दिल्लीमध्ये उधाण

आमगाव- देवरी मतदारसंघात फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, या मतदारसंघात आमदार नसतानाही संजय पुराम यांनी विभागाच्या विकासासाठई अनेक काम महायुती सरकारकडून मंजूर करून घेतली. मात्र याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने धानाला बोनस जाहीर केले पण या लबाडांनी बोनस दिलाच नाही. पंरतु आपल्या सरकारने पुन्हा सत्तेत आल्यानंतर धानाला १५ हजार बोनस रुपये बोनस दिला. त्या पुढील वर्षी २० हजार रुपये बोनस म्हणून दिले. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर धानासाठी २५ हजार रुपये बोनस देणार आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आपले सरकार आहे, असे ही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.