…तर धर्मयुध्द करण्याची वेळ येईल; Devendra Fadanvis यांचे आवाहन

६० टक्के मुंबईकरांचे जीवन हे प्रवासातच जाते. त्यांचा क्वॉलिटी टाईम प्रवासातच जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली उपनगरीय रेल्वेचा चेहरा बदलला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

194

महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी उलेमांच्या १७ मागण्या मान्य केल्या. या मागण्या मान्य करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या उबाठाचे शिवसेनेचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी वाचल्या नाही का, असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या मागण्यात २०१२ ते २०२४ मध्ये जेवढ्या दंगली घडल्या आहेत, त्यातील मुस्लिम दंगलखोर, आरोपी आहेत त्यांना सोडून देण्याची अट आहे. ही मागणी महाविकास आघाडीने मान्य केल्याने त्यांना आता आपली ताकद दाखवून द्या. याविरोधात धर्मयुध्द करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महायुतीच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांची जंत्रीच वाचून दाखवून ही सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने केल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले, ६० टक्के मुंबईकरांचे जीवन हे प्रवासातच जाते. त्यांचा क्वॉलिटी टाईम प्रवासातच जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली उपनगरीय रेल्वेचा चेहरा बदलला आहे. मग ते फलाट असो त्याठिकाणी लिफ्ट, सुशोभीकरण, वाढवलेल्या गाड्या, पादचारी पुल, सरकते जिने, स्थानकांचा विकास अशाप्रकारे विकास करून चेहरा बदलला आहे. मागील अकरा वर्षांत जे आधीच्या सरकारने काही केले नाही ते महायुती सरकारने करत साडेतीनशे किलोमीटरचे मेट्रो रेल्वेच नेटवर्क सुरु केले आहे. कोस्टल रोड सुरु केला आहे, नरीमन पॉईंटपासून वरळी पर्यंत सुरु केला आहे आणि वरळी ते वर्सोवा आणि वर्सोवात पुढे मढ आणि पुढे उत्तनपासून विरारपर्यंत कोस्टल मार्ग बनवला जात आहे. त्यामुळे भविष्यात नरीमन पॉईंटपासून विरारपर्यंतचे अंतर ४० मिनिटांमध्ये पार करता येईल. विरारपासून पुढे विरारपासून अलिबाग पर्यंत जोडला जात आहे. तर मुंबई ते नवी मुंबई हा २२ किलोमीटर लांबीचा अटल सेतू जोडला गेला आहे, असे फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

(हेही वाचा बंद सम्राटाला कायमचे बंद करा; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात)

घरांचा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नेतृत्वाखाली सोडवला जात आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास असो वा अभ्युदयनगरचा पुनर्विकासाचा असो, अशा अनेक योजना सुर आहेत. धरावीचा पुनर्विकास केला जात आहे. पुढील पाच ते सात वर्षांत धारावीचा माणूस धारावीतच राहील अशाप्रकारे मोदीजींच्या आशिर्वादाने मुंबईत पुनर्विकासाच्या अनेक गोष्टी दूर केल्या जात आहेत. आज पुनर्विकासाबाबतचे १८ निर्णय घेण्यात आले असून अशाप्रकारचे १६०० प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे सध्या १०० चोरस फुटांच्या घरांत राहणारे कुटुंब आता ५०० चौरस फुटांच्या घरात राहायला जाणार आहे. झोपु योजनेला चालना देण्यात येत आहे. यामुळे याचा फायदा मराठी कुटुंब, स्थानिकांना होत आहे. त्यामुळे महायुती ही केलेल्या कामांवर मत मागे आणि काही लोकही लांगुलचालनावर मत घेत असतात असेही फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.