Devendra Fadanvis : ‘मी पुन्हा येईन’ची चर्चा पुन्हा का झाली ?

महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत खात्यावरून 'नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन', असे सांगणारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री (Maharashtra CM) होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली.

26
Devendra Fadanvis : 'मी पुन्हा येईन'ची चर्चा पुन्हा का झाली ?
Devendra Fadanvis : 'मी पुन्हा येईन'ची चर्चा पुन्हा का झाली ?

महाराष्ट्र भाजपाच्या X (ट्विटर) खात्यावरून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. (Devendra Fadanvis) महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत खात्यावरून ‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’, असे सांगणारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री (Maharashtra CM) होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. २ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दौरा करत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची ही नवी रणनीती असल्याचेही बोलले गेले. त्यानंतर तासाभरातच हे ट्वीट डिलीट करण्यात आले. (Devendra Fadanvis)

(हेही वाचा – Mumbai University : महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थांना मनस्ताप; मुंबई विद्यापीठ करणार कारवाई)

भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आलेल्या या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, याच निर्धाराने, याच भूमिकेत. याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन ! (Devendra Fadanvis)

New Project 14 4

देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यामुळे विरोधकांनी अनेकदा त्यांची खिल्ली उडवली आहे. तेव्हा राज्यातील घडामोडींमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. त्यामुळे पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. आता या ट्विटमुळे त्यांचे मनसुबे काय आहेत, याविषयी चर्चा या निमित्ताने घडून आली. (Devendra Fadanvis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.