Delhi Water Crisis: जलमंत्री अतिशी यांचे बेमुदत उपोषण हे राजकीय षडयंत्र! जाणून घ्या कसे

जलसंकटामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.

143
Delhi Water Crisis: जलमंत्री अतिशी यांचे अनिश्चित काळासाठी उपोषण हे राजकीय षडयंत्र! जाणून घ्या कसे

दिल्लीतील (Delhi) पाणीटंचाई (Water Crisis) अद्याप संपलेली नाही. लोक पाण्यासाठी धडपडत आहेत. लोकांना पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दिल्लीतील काही भागांत पाणी साचले आहे. तरीही आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) बेमुदत (Indefinite Hunger Strike) उपोषण सुरू आहे.

जलसंकटामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. जलमंत्री अतिशी यांचे उपोषण सुरू असून उपोषणाचा आज सोमवारी, (२४ जून) चौथा दिवस आहे. दिल्लीच्या जंगपुरा येथील भोगल कॉलनीतील इंडिया टीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जलमंत्री अतिशी पाण्यासाठी उपोषण का करत आहेत? लोकं म्हणत आहेत की, आमच्या वसाहतीत भरपूर पाणी आहे.

(हेही वाचा – देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले… )

सुविधांसह उपोषण !
दिल्लीचे जलमंत्री अतिशी यांचे शुक्रवारपासून जंगपुरा येथील भोगल येथे बेमुदत उपोषण सुरू आहे, मात्र यामध्ये एक गमतीशीर बाब अशी की, ते सकाळी किंवा सायंकाळी दिवसातून फक्त एकदाच उपोषणाला बसतात तसेच उपोषणाला बसताना त्यांच्या सोबत अनेक सुखसुविधांची सोयही करण्यात आलेली असते.

उपोषण फक्त निमित्त !
इंडिया टीव्हीच्या पत्रकाराने घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्याला जलमंत्री अतिशी उपोषण स्थळी उपस्थित नव्हते. पत्रकाराने जेव्हा दिल्लीतील भोगल कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा तेथील रहिवाशांनी सांगितले की, आतिशी उपवास का करत आहेत? इथे पाणी आहे, जिथे पाणी नाही तिथे जा आणि तिथे बसा. उपोषण हे केवळ एक निमित्त आहे. आम्हाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते बंद आहेत. हा सर्व जलमंत्र्यांनी केलेला बहाणा आहे. ते त्यांच्या ठरलेल्या वेळनुसार येथे येतात. उपोषणाला बसतात आणि निघून जातात. उपोषण हे फक्त निमित्त आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.