Delhi Assembly Election : मोठ्या पक्षांसाठी लहान पक्ष डोकेदुखी ठरणार

79
Delhi Assembly Election : फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता
  • प्रतिनिधी

देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आप, भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख ३ पक्षांमध्ये तिरंगी लढत होईल. मात्र, या तिन्ही मोठ्या पक्षांसाठी लहान पक्ष डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. लहान पक्षांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवल्यास प्रमुख पक्षांचा गेमप्लॅन बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीच्या राजकीय रणसंग्रामात अनेक लहान पक्षांनी उडी घेतली आहे. त्यापैकी बसपा आणि एमआयएम या पक्षांकडे दुर्लक्ष करता येऊ शकणार नाही. बसपाने दिल्लीतील विधानसभेच्या सर्व ७० जागा लढवण्याची तयारी चालवली आहे. तर, एमआयएम मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय असणाऱ्या डझनभर जागांवर उमेदवार देणार आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Mahakumbh मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान)

भारतीय लिबरल पार्टी (बीएलपी) हा पक्षही सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अमेरिकास्थित डॉक्टर मुनीशकुमार रायजादा यांनी नुकतीच त्या पक्षाची स्थापना केली. सुमारे १५ महिन्यांपूर्वी भारतात परतलेल्या रायजादा यांनी थेट आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात केजरीवाल यांच्यासमवेत कार्य केले. त्या आंदोलनाचा विश्वासघात अरविंद केजरीवाल यांनी केल्याची भूमिका घेत रायजादा यांनी आपविरोधात एल्गार पुकारला आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – 8th Pay Commission : आठवा वेतन आयोग नेमका कधी स्थापन होणार? तो कसं काम करणार?)

दिल्लीतील निवडणूक आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढत आहेत. अशा स्थितीत एनडीएच्या घटकपक्षानेही वेगळी चूल मांडली आहे. केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातही उतरवले आहेत. याशिवाय अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही उमेदवारांची घोषणा केली आहे. अशा स्थितीत त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांचा फटका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता आहे. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.