छत्रपती शिवरायांविषयी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर DCM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला तीव्र संताप

144
छत्रपती शिवरायांविषयी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर DCM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला तीव्र संताप

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाटील यांनी शिवाजी महाराजांनी सुरतमधून पैसे उकळल्याचे वक्तव्य केले होते, त्यावर फडणवीसांनी महाराजांना “दरोडेखोर” संबोधण्याचा आरोप केला. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “माझा राजा कधीही दरोडेखोर नव्हता,” आणि महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारची टिप्पणी सहन केली जाणार नाही.

फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) पाटील यांना उत्तर देताना सांगितले की, शिवाजी महाराजांचे कृत्य स्वराज्याच्या रक्षणासाठी होते आणि त्यांना ब्रिटिश इतिहासकारांच्या दृष्टीकोनातून पाहणे चुकीचे आहे. त्यांनी भारतीय विद्वानांना आवाहन केले की, शिवाजी महाराजांच्या बदनामीसाठी ब्रिटिश इतिहासकारांनी पसरवलेल्या चुकीच्या माहितीचा प्रतिवाद करावा.

(हेही वाचा – Kolkata Rape Case प्रकरणी ठोस कारवाई न केल्याने TMC च्या खासदाराचा राजीनामा)

शरद पवार गटाने पाटील यांच्या विधानाचे समर्थन करत, “खंडणी” शब्दाचा इतिहासातील संदर्भ दिला. त्यांनी नमूद केले की १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत शहराला एक पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी वार्षिक १२ लाख रुपये खंडणी मागितली होती. पवार गटाने सांगितले की, इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या चरित्रात देखील “खंडणी” शब्दाचा उल्लेख आहे.

या वादामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुन्हा एकदा चर्चा झाली आहे, त्यात एक बाजू महाराजांच्या कर्तृत्वाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरी बाजू इतिहासातील नोंदींचे दाखले देत आहेत. फडणवीसांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, ज्यांचे सरकार खंडणीखोर म्हणून ओळखले जाते, तेच नेते अशा प्रकारच्या आरोप करतात. या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे योग्य मूल्यांकन करण्याचे आवाहन फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.