Dasara Melava च्या टिझरमधून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा; काँग्रेसच्या पंजाला बांधलेला वाघ अन् ठाकरेंच्या हातात…

258
Dasara Melava च्या टिझरमधून एकनाथ शिंदेचा ठाकरेंवर निशाणा; काँग्रेसच्या पंजाला बांधलेला वाघ अन् ठाकरेंच्या हातात...
Dasara Melava च्या टिझरमधून एकनाथ शिंदेचा ठाकरेंवर निशाणा; काँग्रेसच्या पंजाला बांधलेला वाघ अन् ठाकरेंच्या हातात...

शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) होतो. शिवसेनेचे संस्थापक हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. मात्र शिवसेनेत फुट पडल्यापासून शिवसेना आणि उबाठा गटाचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे (Dasara Melava) मुंबईत होत असतात. यंदाही उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाचा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होणार असून शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.

(हेही वाचा : Sion Koliwada मध्ये विद्यमान आमदारांनी गरब्यात नाचवले गौतमी, शिल्पाला; तर इच्छुक उमेदवार नवदुर्गांच्या सन्मानात

दरम्यान एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या टीझरमधून ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. या टीझरमध्ये वाघ काँग्रेसच्या हाताच्या पंजाला बांधलेला दिसत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हेच या वाघाला दावणीला बांधत असल्याचे दिसते. त्याच्याबरोबर या हातावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नायकासारखे बाण मारतात आणि वाघाला मुक्त करतात. त्यामुळे पट्ट्यातून मुक्त झालेला वाघ एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मिठी मारतो. अशाप्रकारे व्यंगचित्राचा वापर करून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधण्यात आला आहे. हे टिझर एकनाथ शिंदेंच्या फेसबुक पेजवरही शेअर करण्यात आले आहे. या टिझरमध्ये धर्मवीर- २ मधील आनंद दिघे यांच्या तोंडी असलेली अभिनेता प्रसाद ओकच्या आवाजातील वाक्यही ऐकायला मिळतात. (Dasara Melava)

हेही वाचा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.