Dahihandi 2024 : मुंबईत दहीहंडीच्या निमित्ताने ‘महायुती-महाविकास’चे शक्तिप्रदर्शन

उत्सवात राजकीय पक्षांमध्ये वर्चस्व दाखवण्यासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.

104

विधानसभा निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव (Dahihandi 2024) मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने लाखोंची बक्षिसे असलेल्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून शक्तिप्रदर्शन होणार आहे. या उत्सवात राजकीय पक्षांमध्ये वर्चस्व दाखवण्यासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरात महायुती आणि मविआ यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. मागाठाणे येथे शिवसेना (शिंदे गट) प्रकाश सुर्वे पांची लक्षवेधी दहीहंडी (Dahihandi 2024) ठरणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी विधानसभा कल्पना प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने मालाड पूर्व, सावरकर मैदानात मानाची हंडी बांधण्यात आली आहे. या वेळी विजेत्यांना पाच लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी सिनेकलाकारांची उपस्थित असणार आहे. (Dahihandi 2024)

आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या खाली पाच लाख ५५ हजार ५५५ रुपयांची मानाची हंडी बांधण्यात येणार आहे. मुंबई प्रदेश भाजपा चित्रपट नाट्य आघाडीच्या वतीने दहीहंडी बांधण्यात येणार आहे. मुंबई प्रदेश भाजपा चित्रपट नाट्य आघाडीचे महामंत्री विनय नाईक व उपाध्यक्ष ओंकार दळवी यांनी या हंडीचे (Dahihandi 2024) आयोजन केले आहे.

(हेही वाचा Assembly Elections : मुंबईच्या जागांवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये रस्सीखेच)

भाल्याने हंडी फोडणार

अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वेसावा कोळीवाड्यात लाकड़ी काठीला टोकदार अणकुचीदार भाला बांधून भाल्याने दहीहंडी फोडण्याची पुरातन परंपरा आहे. यंदा मांडवी गाली कोळी समाज संस्थेता दहीहंडी फोडण्याचा मान नऊ वर्षांनी मिळाला आहे. (Dahihandi 2024)

प्रत्येक थराला बक्षीस 

अंधेरी पूर्व, मरोळ, मरोळ-मरोशी रोड, डीलाईट बेकरीसमोर शिवसेना (ठाकरे) अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांच्या वतीने १,११,१११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून प्रत्येक थराला बक्षीस देण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील घाटकोपर येथे भाजप आमदार राम कदम यांची दहीहंडी असणार आहे. वरळीत भाजपची परिवर्तन दहीहंडी, दादर आयडियल येथे विशेष महिलांसाठी, नक्षत्र मॉल येथे मनसेने दहीहंडीचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे, कल्याण संपर्कप्रमुख, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गशनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात दहीहंडी उत्सवाचे (Dahihandi 2024) आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने आयोजित या उत्सवात एकूण एक लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षिसे देण्यात उत्सा येणार आहेत. या दहीहंडी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितो असणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.