Corporation appointments : राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या ; महायुतीच्या ‘या’ नेत्यांना आता मिळणार कॅबिनेटचा मंत्रीपदाचा दर्जा

188
Corporation appointments : राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या ; महायुतीच्या ‘या’ नेत्यांना आता मिळणार कॅबिनेटचा मंत्रीपदाचा दर्जा
Corporation appointments : राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या ; महायुतीच्या ‘या’ नेत्यांना आता मिळणार कॅबिनेटचा मंत्रीपदाचा दर्जा

विधानसभा निवडणुकीची (Assembly elections 2024) आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारने महामंडळांवर अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी २७ महामंडळांवर विविध नेत्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. तसेच विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात असून या यादीत पुणे जिल्ह्यातून भाजपाच्या किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विद्यमान पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे (Vasudev Kale) यांच्यासह अनेक नेत्याचा समावेश आहे. (Corporation appointments)

(हेही वाचा – Zakir Naik चा व्हिडिओ पाहून सलमान धर्मांध बनला; हैदराबादच्या मंदिरात घुसून मूर्तीची केली विटंबना)

२७ महामंडळांवर कोणाकोणाला मिळाली संधी? 

१) महाराष्ट्र रोजगार हमी परिषद- श्री शहाजी पवार- अध्यक्ष
२) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ- श्री दिलीप कांबळे- अध्यक्ष
३) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती- श्री सचिन साठे- उपाध्यक्ष
४) महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग- श्री सतीश डोगा अध्यक्ष, श्री मुकेश सारवान- उपाध्यक्ष
५) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ- श्री निलय नाईक- अध्यक्ष
६) महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ- श्री अरविंद पोरट्टीवार- अध्यक्ष
७) महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ – श्री प्रशांत परिचारक – अध्यक्ष
८) मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ – श्री इद्रिस मुलतानी – उपाध्यक्ष
९) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ – श्री प्रमोद कोरडे – अध्यक्ष
१०) महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद- श्री वासुदेव नाना काळे – अध्यक्ष
११) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ -श्री विजय वडकुते- अध्यक्ष, श्री बाळासाहेब किसवे – उपाध्यक्ष, श्री संतोष महात्मे – उपाध्यक्ष
१२) महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ – श्री अतुल काळसेकर – अध्यक्ष
१३) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ – श्री राजेश पांडे -अध्यक्ष
१४) महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ – श्री गोविंद केंद्रे- अध्यक्ष
१५) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)- श्री बळीराम शिरसकर- सदस्य
१६) राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ –  श्री दौलत नाना शितोळे – उपाध्यक्ष
१७) महाराष्ट्र वन विकास महामंडळ – श्री अतुल देशकर – उपाध्यक्ष
१८) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती – श्री नरेंद्र सावंत-अध्यक्ष
१९) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) –  श्रीमती मिनाक्षी शिंदे अध्यक्षा,  श्रीमती राणी व्दिवेदी उपाध्यक्षा
२०) आदिवासी विकास महामंडळ – श्री काशिनाथ मेंगाळ – अध्यक्ष
२१) पै. कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – श्री विजय चौगुले – उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
२२ ) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई –  श्री अजय बोरस्ते – उपाध्यक्ष
२३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ -श्री भाऊसाहेब चौधरी – उपाध्यक्ष
२४) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  –  श्री आनंद जाधव – उपाध्यक्ष
२५) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ – श्री कल्याण आखाडे – उपाध्यक्ष
२६) राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ  – श्री श्रीनाथ भिमाले – अध्यक्ष
२७ ) महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद -श्री संदीप लेले- अध्यक्ष, श्री अरुण जगताप- उपाध्यक्ष 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.