पुण्यात काँग्रेसला धक्का! Sangram Thopate यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

42
पुण्यात काँग्रेसला धक्का! Sangram Thopate यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
पुण्यात काँग्रेसला धक्का! Sangram Thopate यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

Sangram Thopate : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी संग्राम थोपटे यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी २२ एप्रिलला संग्राम थोपटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीरप्रवेश संपन्न झाला. (Sangram Thopate)

(हेही वाचा – फुकट्या प्रवाशांकडून Central Railway ने वर्षभरात वसूल केली ‘इतकी’ मोठी रक्कम  )

कॉंग्रेस सोडण्यामगचे ‘हे’ आहे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातल्या भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भाजपाच्या मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला. गेली तीन टर्म ते आमदार होते. पण गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तेव्हापासून ते अस्वस्थ असल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली.


भोर विधानसभा मतदार संघातील भोर, राजगड, मुळशी या तिन्ही तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संग्राम थोपटे भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. दरम्यान भोरमधील शिवतीर्थ चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भोर शहरातील थोपटे यांचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी पहाटे साडेचार वाजता मुंबईकडे रवाना झाले.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill : वक्फ बोर्डात गैर मुसलमान सदस्य का घेतले ? जेपीसी सदस्याने दिले उत्तर…)

संग्राम थोपटेंनी सांगितले काँग्रेस सोडण्यामागचं कारण
दरम्यान, संग्राम थोपटे यांनी २० एप्रिल रोजी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस सोडताना मनात असलेली खदखद व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले होते की, ‘काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे. पण ही वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा मला डावलण्यात देखील आले. २०१९ साली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळाली होती. मला संधी मिळेल अशी भावना होती. पण तेव्हा मला संधी मिळाली नाही”, असंही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.