Congress : खरगे यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत येणार?

141
Congress : खरगे यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत येणार?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यावर जमीन प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार लहरसिंह सिरोया यांनी केला आहे. यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात नवा जमीन घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे कुटुंबीय वादात सापडले आहेत. कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डाच्या (KIADB) जमिनीच्या वाटपावर भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार लहरसिंह सिरोया यांनी खरगे यांच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या ट्रस्टवर प्रश्न उपस्थित केले आहे.

‘खर्गे कुटुंब एरोस्पेस उद्योजक बनले आणि केआयएडीबी जमिनीसाठी पात्र कधी झाले? असा प्रश्न सिरोया यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांनी मार्च २०२४ मध्ये या वाटपासाठी संमती कशी दिली? लहरसिंह सिरोया यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती)

सिरोया यांनी निवेदनात म्हटले आहे की, “मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने अनुसूचित जातीच्या अंतर्गत नागरी सुविधांसाठी एक कंत्राट दिले असल्याचे एका अहवालावरून समोर आले आहे. (बेंगळुरूजवळील हाय-टेक डिफेन्स एरोस्पेस पार्कमधील कोटा) ५ एकर जमीन (एकूण जमीन ४५.९४ एकर) देण्यात आली आहे.

कर्नाटक राज्याचे अवजड व मध्यम उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचे पुत्र राहुल खरगे यांनी चालवलेल्या शैक्षणिक ट्रस्टला एरोस्पेस पार्कमध्ये ठराविक किमतीत नियमानुसार भूखंड देण्यात आला होता. या प्रक्रियेत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धार्थ विहार ट्रस्टला एरोस्पेस पार्कमध्ये केआयएडीबीच्या नियमांनुसार निश्चित किंमतीत भूखंड देण्यात आला आहे. वाटप प्रक्रियेत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. वाटप निश्चित किंमतीवर झाले आणि कोणतीही सवलत दिली गेली नाही.

(हेही वाचा – Dinesh Karthik : दिनेश कार्तिक निवृत्तीनंतर खेळणार लीजेंड्स कप लीग)

खरगे यांचे संपूर्ण कुटुंब ट्रस्टवर

विशेष म्हणजे ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये स्वतः खरगे, त्यांची पत्नी राधाबाई खरगे, त्यांचे जावई आणि गुलबर्गाचे खासदार राधाकृष्ण दोड्डामणी, मुलगा आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खरगे आणि दुसरा मुलगा राहुल खरगे यांचा समावेश आहे. (Mallikarjun Kharge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.