नाना पटोले यांचे रा.स्व. संघाशी संबंध म्हणून काँग्रेस हरली; Congress च्या गोटातून गंभीर आरोप

काँग्रेसने १०१ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळू शकला. काँग्रेसचा ८५ जागांवर झालेल्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत आहेत, असे बंटी शेळके म्हणाले.

138
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाल्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्याच गोटातून आरोप होऊ लागले आहेत. नाना पटोले यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंध असल्याने काँग्रेसचा (Congress) पराभव झाला, असा आरोप नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार बंटी शेळके यांनी केला. त्यामुळे आता नाना पटोले चर्चेत आले आहेत.

कोण आहेत बंटी शेळके? 

बंटी शेळके यांनी नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या दरम्यान त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचा रोड शो झाला होता. त्यावेळ भाजपाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी प्रचार केला होता. प्रचाराच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर जोरदार कुरघोडी केली होती. त्यामुळे बंटी शेळके यांच्या त्यांच्या विजयाचा विश्वास होता. तरीही त्यांचा पराभव झाला.

काय केले आरोप? 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहेत. हे मी टिळक भवनासमोर उभा राहून सांगतोय. माझ्या मतदारसंघात प्रियंका गांधी वाड्रा आलेल्या असतानाही काँग्रेसचे (Congress) नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तिथे आले नाहीत. प्रियंका गांधी वाड्रा या फक्त शेळकेसाठी प्रचार करायला आल्या नव्हत्या. त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. पण माझ्यासाठी काँग्रेसची (Congress) संघटना प्रचारात उतरली नाही. काँग्रेसने १०१ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळू शकला. काँग्रेसचा ८५ जागांवर झालेल्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत आहेत. शुक्रवारी मुंबई येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत मी नाना पटोले यांची तक्रार केली आहे. काँग्रेस (Congress)  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत जर विजय मिळवायचा असेल तर काँग्रेस नेतृत्वाने आताच यात लक्ष घालून नाना पटोले यांना बाजूला करायला हवे किंवा त्यांना समज द्यायला हवी, अशी मागणीही बंटी शेळके यांनी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.