‘Matoshree’ च्या मतदार संघावर काँग्रेसचा दावा

99
'Matoshree' च्या मतदार संघावर काँग्रेसचा दावा
  • खास प्रतिनिधी 

महाविकास आघाडीत ‘मातोश्री’च्या (Matoshree) निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदार संघावर काँग्रेसने दावा ठोकला असल्याने शिवसेना उबाठामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

काँग्रेस-उबाठा पहिल्यांदाच आघाडीत

परंपरागत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत वांद्रे पूर्व मतदार संघ काँग्रेसकडे राहिला आहे तर शिवसेना-भाजपा युतीत शिवसेनेने या मतदार संघात उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पहिल्यांदाच आघाडीत विधानसभा लढत असल्याने दोघांनी या मतदार संघातून लढण्याची तयारी केली आहे.

(हेही वाचा – Sukanya Samriddhi Yojana : १ ऑक्टोबरपासून ‘हे’ आर्थिक नियम बदललेत, सुकन्या समृद्धीमध्येही होणार बदल)

वांद्रे पूर्व काँग्रेसचा हक्क

काँग्रेसचे आमदार आणि माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी वांद्रे पूर्व हा मतदार हक्काचा असल्याचे म्हटले आहे. तसेच या मतदार संघात विद्यमान आमदार काँग्रेसचे (सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले) झिशान सिद्दीकी असून काँग्रेसची या मतदार संघातून लढण्याची तयारी आहे, असे म्हटले आहे. या मतदार संघातून काँग्रेसचे सचिन सावंत यांचे बॅनर झळकू लागल्याने काँग्रेसचा दावा हा पक्का मानला आहे. (Matoshree)

(हेही वाचा – RBI Monetary Committee : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीत मोठे बदल, कोण इन? कोण आऊट?)

ठाकरेंचे कामाला लागण्याचे निर्देश

तर दुसरीकडे शिवसेना उबाठाने वांद्रे पूर्व मतदार संघातून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले असल्याचे समजते. वांद्रे पूर्व विधानसभा विभागप्रमुख पदी सरदेसाई यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून एकप्रकारे ठाकरेंनी त्यांना मतदार संघात कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. आजवर या मतदार संघातून शिवसेनेचे बाळा सावंत निवडून येत होते, पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. परंतु मागील सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सिद्दीकी विजयी झाले.

दरम्यान, महायुतीकडून भाजपाचे महेश (कृष्णा) पारकर यांचे नाव चर्चेत आहे. महायुतीत शिवसेना (शिंदे) यांनी ही जागा भाजपाला सोडल्यास महेश पारकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Matoshree)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.