Mahavikas Aghadi मध्ये आरोप करण्यातही गोंधळ

124
Mahavikas Aghadi मध्ये आरोप करण्यातही गोंधळ
Mahavikas Aghadi मध्ये आरोप करण्यातही गोंधळ

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा काही महिन्यातच कोसळलेला पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) हे कुणाशी संबंधित आहेत, यावरून महाविकास आघाडीतच मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. (Mahavikas Aghadi)

(हेही वाचा- La Nina चा प्रभाव; यंदा मान्सून कालावधी लांबणार)

विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाविकास आघाडीला राजकारण करण्यासाठी एक नवा मुद्दा मिळाला. घटना दुर्दैवी असली तरी त्यातूनही सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही. आरोप करण्यातही विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. आपटे हे भाजपाच्या जवळचे असल्याचा आरोप केला तर कुणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर तिसऱ्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याचा ठपका ठेवला. (Mahavikas Aghadi)

उबाठामध्ये आपापसात कुरघोडी

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आणि नव-शिवसैनिक सुषमा अंधारे यांच्यातही एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. राऊत यांनी आपटेंचा संबंध थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी असल्याची बोंब ठोकली तर अंधारे (Andhare) यांनी अंधारात बाण मारत भाजपा आणि आमदार नितेश राणे यांच्याशी संबंध जोडला. यावरून आपल्या पक्षातच नाही तर आघाडीतही समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. (Mahavikas Aghadi)

(हेही वाचा- Ind vs Ban, Test Series : संघ निवडीच्या पहिल्या परिक्षेत सूर्यकुमार, श्रेयस नापास; बांगलादेश मालिकेसाठी पत्ता कट?)

पटोलेंची उडी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही यात उडी घेत आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याची आवई उठवली. मग सत्ताधाऱ्यांमधून सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यात भर घालत आपटे हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा माणूस असल्याचे सांगितले. (Mahavikas Aghadi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.