CM Eknath Shinde यांचा पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांना आदेश; म्हणाले, रस्त्यांवरील…  

103
CM Eknath Shinde यांचा पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांना आदेश; म्हणाले, रस्त्यांवरील...  
CM Eknath Shinde यांचा पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांना आदेश; म्हणाले, रस्त्यांवरील...  

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच काही रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत असतानाच, महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर (Commissioner Shekhar Singh) सिंह यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चांगलीच कानउघडणी केली. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग शुल्कापोटी २१.९४ लाखांची थकबाकी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शहरात खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) होत आहे. ती सोडवायची असेल तर खड्डे बुजवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची कानउघाडणी केली. त्यामुळे आयुक्तांनी मंगळवारी (दि. ६) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्ड्यांबाबत जाब विचारला; तसेच तातडीने खड्डे बुजवून अहवाल देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – MHADA : म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर; शुक्रवारी होणार ‘गो लाईव्ह’)

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात थोडा पाऊस झाला की, रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात होते. रस्ते खोदाईस १५ मेनंतर परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते; मात्र अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पावसाळ्यात बिनधास्त खोद काम सुरू असते. सध्या तर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खोदाई सुरू आहे. अगोदरच खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्यात खोदाईमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांची भर पडते. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात पक्के, कच्चे असे २०७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. तसेच मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, भोसरी, चऱ्होली, तळवडे, ताथवडे, वाकड, सांगवी यांसह वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.