CM Eknath Shinde यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती

128
CM Eknath Shinde यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती
CM Eknath Shinde यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री‍पदाचा राजीनामा सोपवला आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही उपस्थित होते. या वेळी पुढील सरकारचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.

(हेही वाचा – Weather Update: मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; तर नाशिक, पुणे गारठलं!)

मुख्यमंत्री कोण होणार  ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिले आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगली आहे.

याविषयी माध्यमांशी बोलतांना दीपक केसरकर यांनी तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह घेणार आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांना तो निर्णय मान्य आहे. उद्याच भाजपची बैठक असू शकते, त्यात निर्णय होऊ शकतो, असे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.