CM Eknath Shinde यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका; म्हणाले…

229
CM Eknath Shinde यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका; म्हणाले...
  • प्रतिनिधी

कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो ३, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले अन्यथा १५ वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी येथे थेट शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरळीमधील निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सरकारच्या कामांचा लेखाजोखाच मांडला.

मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले की, मिलिंद देवरा यांनी यापूर्वी दोनवेळा लोकसभेत वरळीकरांचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वर्षात वरळीकरांना जो न्याय मिळायला हवा होता तो दुर्देवाने मिळाला नाही. त्यामुळे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. देवरा मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Samajwadi Party इंडी आघाडीमधून बाहेर पडणार?)

वरळीतील स्पॅन वायडनिंगचा प्रश्न सोडवण्यास आधीच्या सरकारने असमर्थता दाखवली होती. मात्र मुख्यमंत्री झाल्याबरोबर हा प्रश्न तातडीने सोडवला. प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, बी.डी.डी चाळ, पोलीस वसाहती वरळी कोळीवाडामधील रखडलेले प्रकल्प, धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्याचे काम सरकारने केले. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी ७ एजन्सी आज एकत्रपणे काम करत आहेत. रमाबाई नगरमधील १७००० भाडेकरुंना घरे देणार आहोत. मुंबईबाहेर फेकलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करेल, अशीही ग्वाही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही एकच टेप रेकॉर्ड काहीजण लावतात. मात्र आता ही रेकॉर्ड चालणार नाही, असा सणसणीत टोला ठाकरे यांना लगावतानाच मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर, फिनटेक कॅपिटल आणि पॉवरहाऊस बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे पाच मिनिटे तुमची तर पाच वर्षे आमची हा आमचा शब्द आहे. काम करणाऱ्या लोकांना मत द्यायचे असून घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवायचे आहे, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.