CM Eknath Shinde: मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश 

134
CM Eknath Shinde: मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश 
CM Eknath Shinde: मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश 

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” (Leo Polymer Technology) हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर ठाणे-नाशिक महामार्गावरील (Thane-Nashik Highway) रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना शुक्रवार (९ ऑगस्ट) रोजी दिले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Bandra Fort : वांद्रे किल्ला निघणार झगमगून)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवार ठाणे-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.  

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे-नाशिक हे जे अंतर आहे ते पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. या मार्गावरील खड्यांमुळे तसेच येथील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण, एमएमआरडीए, पोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहने आहेत त्यांना पार्किंग लॉट मध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात यावी. जेव्हा ट्रॉफिक कमी होईल तेव्हा अवजड वाहने सोडण्यात येतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – ‘असा आदेश शेवटच्या क्षणी देता येणार नाही’ ; NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली  )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे सुहास मेहता व त्यांच्या टिमचे यावेळी आभार मानले. या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे संबधितांना निर्देश देवून ते पुढे म्हणाले की,  हा लाखो प्रवाशांचा विषय आहे. हा कोणाचा रस्ता आहे, कोण बनवतय, हे काम कोण करीत आहे, हे महत्वाचे नसून सर्वांनी टिम बनून हे काम पूर्ण करायचे आहे.

यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव (Thane Municipal Commissioner Saurabh Rao), एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (Collector Ashok Shingare) यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.