CM Devendra Fadnavis यांची क्लॉस श्वाब यांच्याशी भेट, दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

79
CM Devendra Fadnavis यांची क्लॉस श्वाब यांच्याशी भेट, दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज
CM Devendra Fadnavis यांची क्लॉस श्वाब यांच्याशी भेट, दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आर्थिक मंचाचे (World Economic Forum) संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची दावोस येथे भेट घेतली. या बैठकीत हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, तसेच उद्योग क्षेत्रातील नवीन उपक्रमांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी क्लॉस श्वाब यांनी शुभेच्छा दिल्या. (CM Devendra Fadnavis)

दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन उभारण्यात आले आहे, आणि पुढील दोन दिवसांत विविध कार्यक्रम तसेच ऐतिहासिक करार केले जातील. राज्य सरकारकडून विविध कंपन्यांसोबत बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. याआधी १२ सप्टेंबरला मुंबईत गणेशोत्सवाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्वाब यांच्यासोबत श्री गणेशाची आरती केली होती, आणि या भेटीत त्या क्षणाला उजाळा देण्यात आला. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा- विधानसभेत हिरव्या सापांबरोबर मविआचा बंदोबस्त केला; आमदार Sangram Jagtap यांचा हल्लाबोल)

महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि अन्य राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. यानंतर जागतिक आर्थिक मंचाच्या स्वागत समारंभालाही मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर होणार आहे. (CM Devendra Fadnavis)

याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी होरेसिसचे अध्यक्ष फ्रँक जॉर्जन रिक्टर यांचीही भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक असलेल्या रिक्टर यांनी मुंबईत जागतिक कंपन्यांचा एक महत्त्वाकांक्षी परिषद आयोजित करण्याचे प्रस्तावित केले. या परिषदेचा उद्देश नव्या तंत्रज्ञान व नवकल्पनांवर भर देणे असा असेल. तसेच, होरेसिसचे मुख्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा- Guardian Minister : गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई उपनगर येथे सह पालकमंत्री पद निर्माण करण्यामागील काय आहे राजकारण?)

दावोसमधील महाराष्ट्राचे पॅव्हेलियन जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे, आणि राज्य सरकार महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व तंत्रज्ञानासाठी प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.