मुख्यमंत्री Eknath Shinde राजीनामा देणार; ट्वीट करत म्हणाले…

199
राज्यात २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा (Assembly Election Results 2024) निकाल जाहीर झाला असून, महायुती (Mahayuti) मोठ्या मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. तर महाविकास आघाडीचा चांगलाच ‘सुपडा साफ’ झाला आहे. दरम्यान, महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता कमालीची वाढली असून विविध चर्चांना सोमवारी उधाण आले. पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस या भोवतीच चर्चा फिरत आहे. शपथविधीचेही वेगवेगळे मुहूर्त सांगितले जात आहेत.मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता राजीनामा देणार आहेत. तसेच २ डिसेंबर रोजी शपतविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Eknath Shinde)
(हेही वाचा – Mumbai Terrorist Attack : २६/११ हल्ल्याला उलटली १६ वर्षे; मुंबईच्या किनारपट्टीवर सुरक्षेची मोठी आव्हाने)
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेच्या आमदारांची, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपद भाजपाला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे, अशी माहिती मिळाली आहे. भाजपा केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. त्यामुळे शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांकडून वर्षा या निवासस्थानी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट (Eknath Shinde resigns) करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले? 
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

हेही पाहा –

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.