छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण नको! CM Eknath Shinde यांचे आवाहन

88
CM Eknath Shinde : आठ देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मान्यता
  • प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत, अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे मालवणमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे हे त्याहीपेक्षा दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेचे राजकारण न करण्याचे आवाहन गुरुवारी (२९ ऑगस्ट) केले. आता महाराजांचा रुबाबदार पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी विरोधकांनी विधायक सूचना करून सरकाराला सहकार्य करावे, असेही शिंदे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. या घटनेनंतर विरोधी पक्ष महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी घटनास्थळी जाऊन आंदोलन केले. आता आघाडीच्या वतीने येत्या रविवारी सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असून विरोधी पक्षाने या प्रकरणी सरकारच्या माफीनाम्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Crime : शिकाराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ९ राज्ये पालथी घातली, अखेर सापडला दिल्लीच्या कुंटणखान्यात)

या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रसार माध्यमांचा प्रतिनिधींशी बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षाला फटकारले. नौदलाने चांगल्या भावनेने पुतळा उभारला होता. पण पुतळ्याबाबत दुर्दैवी घटना घडली. शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण करू नये. विरोधकांना राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत, असे शिंदे यांनी सुनावले.

शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या चरणांवर एकदा नाही तर १०० वेळा डोकं ठेवायला आम्ही तयार आहोत. महाराजांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही महाराजांसमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी विरोधकांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो, असे शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

(हेही वाचा – Madarsa मध्ये रोज छापल्या जायच्या २० हजार रुपयांच्या बनावट Note)

शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने सर्वांच्या भावना तीव्र आहेत. पुतळा लवकरात लवकर उभा रहावा, अशी जनसामान्यांची भावना आहे. त्यामुळे पुतळा उभारण्यासाठी नेमण्यात आलेली समिती हवामान, वातावरण, वाऱ्याचा वेग या गोष्टींचा विचार करून कायमस्वरूपी मजबूत आणि भक्कम पुतळा उभा राहील याचा निर्णय घेईल. मालवण, राजकोट येथे जागेची पाहणी करणे आणि पुन्हा पुतळा उभारणीच्या कामासाठी नौदलाने हा परिसर संरक्षित करण्याची मागणी केल्याची माहिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.