Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात

96
Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात
Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) अचानक कोसळल्याचे प्रकरण गुरुवारी उच्च न्यायालयात पोहोचले. एका माजी पत्रकाराने फौजदारी जनहित याचिका (High Court) सरकारच्या मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी केली आहे.

फौजदारी जनहित याचिका दाखल
4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर, राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. केतन तिरोडकर (Ketan Tirodkar) यांनी ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. हा पुतळा घाईघाईत उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

याचिकाकर्त्याची मागणी काय?
घटनेसाठी जबाबदार व्यक्तींवर आवश्यक कारवाई करण्याचे आणि प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. याव्यतिरिक्त, राजकोट किल्ल्यावरच महाराजांचा ४० फूट किंवा त्याहून उंच पुतळा नव्याने बांधण्याच्या हेतूने रचना करण्यासाठी, पुतळ्याचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी व्हीजेटीआय, आयआयटी, मुंबईतील हवामान शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा समावेश असलेली एक विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

आवश्यक पर्यावरणीय मूल्यांकन न करता किंवा वाऱ्याच्या वेगाचा विचार न करता हा पुतळा बांधण्यात आला. तसेच, पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले सदोष साहित्यही तो कोसळण्यासाठी कारणीभूत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. एखाद्या बेजबाबदार विकासकांकडून अशिक्षित आणि गरजूंसाठी बेकायदा चाळी बांधण्यात येतात. त्याप्रमाणे, शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे काम सात महिन्यांच्या आत नऊ महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.