Nitesh rane: नितेश राणेंवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

189
Nitesh rane: नितेश राणेंवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Nitesh rane: नितेश राणेंवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये (Ahmednagar) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंवर भडकाऊ भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 153 आणि इतर कलमांखाली भाजप (BJP) आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून हे विधान नितेश राणेंना भोवण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा-Bangladesh Hindu : बांगलादेशात दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना; हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण)

एक गुन्हा श्रीरामपूर तर दुसरा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. वास्तविक रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीनंतर नितेश राणेंची सभा झाली, त्यात त्यांनी मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली. यानंतर त्यांच्याविरोधात कलम 302, कलम 153 सहित अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nitesh rane)

(हेही वाचा-Zomato Net Worth : झोमॅटोचे मालक दिपिंदर गोयल देशातील नवे अब्जाधीश )

नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला उघडपणे धमकी दिली, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैंगबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Nitesh rane)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.