शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर; भाजपाच्या Gopichand Padalkar यांचा पवारांना खोचक टोला

80
शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर; भाजपाच्या गोपीचंद पडळकरांचा पवारांना खोचक टोला
शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर; भाजपाच्या गोपीचंद पडळकरांचा पवारांना खोचक टोला

शरद पवारांमुळे (Sharad Pawar) राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी  कॅन्सर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) दिलेली तेजाची झळाली शरद पवारांमुळे हरवली आहे, असा खोचक टोला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. तसेच  शरद  पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का? असा सवाल देखील पडळकर यांनी केला आहे. (Gopichand Padalkar)

काय म्हणाले गोपीचंद पडळकर काय म्हणाले ? 

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर शरद पवारांना म्हणाले की, सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. ५०-६० वर्षे आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केलंय. (Gopichand Padalkar)

(हेही वाचा – Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय?

तसेच पडळकर म्हणाले, शरद पवारांनी जाती-जातीत वाद लावून महाराष्ट्र अशांत ठेवण्याचे व प्रस्थापितांची घरे भरण्याचे काम केले. त्यांनी भ्रष्टाचार, जातीवाद केला. लोकांमध्ये भांडणे लावली. याला कंटाळून महाराष्ट्राच्या जनतेने २०१४ साली परिवर्तन केले. आता पवारांनी निवांत राहून हरीनामाचा जप करावा. त्यातून त्यांच्या डोक्यात चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल. (Gopichand Padalkar)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.