भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करा; हिंदु जनजागृती समितीची BCCI कडे मागणी !

174
भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करा; हिंदु जनजागृती समितीची BCCI कडे मागणी !

आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडे (BCCI) केली आहे. याविषयीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ (BCCI) येथील विशेष कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले, या वेळी हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता अनीश परळकर, मानव सेवा प्रतिष्ठानचे विनायक शिंदे, धर्मप्रेमी अधिवक्ता राहुल पाटकर, रविंद्र दासारी, संदीप तुळसकर हे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे. (BCCI)

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : राजधानीत गणेश उत्सवाची धूम; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन)

या वेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशसोबत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भारतात आयोजित करण्यात आले आहेत. हे क्रिकेट सामने चेन्नई, कानपूर, ग्वालियर, दिल्ली आणि हैदराबाद येथे होणार आहे. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने हल्ले चालू आहेत. आतापर्यंत २३० लोकांचा मृत्यू झाला असून, बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदूविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. शेख हसीना सरकारच्या राजीनाम्यानंतर हिंदूंच्या विरोधातील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात हिंसाचार अधिक आहे, जिथे हिंदू समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे. नुकतीच उत्सव मंडल या तरुण हिंदु युवकाचे कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जिहादी जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून त्या युवकाचे दोन्ही डोळे काढून चिरडले. अशा प्रकारे बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे करणे, त्यांच्या निर्घृण हत्या करणे हे राजरोसपणे चालू आहे. (BCCI)

(हेही वाचा – Goregaon Constituency मध्ये महाविकास आघाडीत फूट; कपिल पाटील विरुद्ध Shiv Sena UBT?)

मुसलमान समाजावर होणार्‍या कोणत्याही आघाताला इतर मुसलमान देश तीव्र विरोध करतात, तशीच भूमिका भारताने हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात घ्यावी. बांगलादेशात तेथील धर्मांध जिहादी हिंदूंच्या राजरोसपणे हत्या करणार, हिंदूंची घरे जाळणार, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार, भूमी बळकावणार, हिंदू महिलांवर बलात्कार करणार आणि आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेटचे सामने खेळायचे का ? हे आम्ही कदापी सहन करणार नाही, असे समितीने म्हटले आहे. (BCCI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.