Byculla Assembly Constituency : ‘मविआ’ला भायखळ्यात अंतर्गत सुरुंग?

300
Byculla Assembly Constituency : ‘मविआ’ला भायखळ्यात अंतर्गत सुरुंग?
  • खास प्रतिनिधी 

भायखळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुस्लिम मतांवर डोळा असलेला महाविकास आघाडीला घटक पक्षांतील मतभेदच सुरुंग लावणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Byculla Assembly Constituency)

(हेही वाचा – Waqf Board Law वर चर्चा करण्यासाठी २६ तारखेपासून ५ राज्यांमध्ये बैठक)

‘मविआ’त रस्सीखेच

महायुतीकडून भायखळाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचे दोन उमेदवार यांच्यात या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. (Byculla Assembly Constituency)

(हेही वाचा – भरत गोगावले यांची अखेर MSRTC च्या अध्यक्षपदावर वर्णी; पदभार स्वीकारला)

उबाठा जागा सोडणार?

शिवसेना उबाठाकडून माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येते तर काँग्रेसकडून माजी आमदार मधू चव्हाण हे त्यांचे पुत्र समीर यांच्यासाठी आग्रही आहेत. याशिवाय काँग्रेसमधून मुस्लिम उमेदवार झिशान सय्यद हेदेखील इच्छूक आहेत. सय्यद यांना मुस्लिमबहुल भायखळा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जिंकण्याची खात्री आहे. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने उबाठा ही जागा काँग्रेससाठी सोडण्याची शक्यता कमी आहे. (Byculla Assembly Constituency)

(हेही वाचा – Hindu : हिंदू व्यापऱ्यांच्या दुकानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा कडकडीत जालना बंद)

महायुती जागा राखणार

भायखळा मतदारसंघ महाविकास आघाडीत उबाठाच्या वाट्याला गेल्यास सय्यद अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मधू चव्हाण आणि सय्यद यांच्या नाराजीचा तसेच मतविभागणीचा फायदा जाधव यांना होऊ शकतो, अशी चर्चा आहे. याशिवाय ‘एमआयएम’चे माजी आमदार वारिस पठाण हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने महायुतीला ही जागा पुन्हा आपल्याकडे राखण्यात यश येईल, असे बोलले जाते. (Byculla Assembly Constituency)

(हेही वाचा – Shiv Sena UBT चे शरद पवार यांना आव्हान; २८८ जागा लढण्याची तयारी)

११,००० मते कमी

वास्तविक, यामिनी जाधव यांनी नुकतीच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना स्वतःच्या भायखळा विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभेला मिळालेल्या मतदानापेक्षा जवळपास ११,००० मते कमी मिळाली आणि उबाठाचे अरविंद सावंत निवडून आले. जाधव यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५१,००० मते मिळाली होती तर लोकसभेला त्यापेक्षा ११,००० मते त्यांना कमी मिळाली. (Byculla Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.