BMC Election: विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार ?

225
Animal Census : मुंबईत २१ व्या पशुगणनेस प्रारंभ, येत्या २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहणार सुरू

राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA) 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. राज्यात 133 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना 57 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर यश मिळाल आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (BMC Election) बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. (BMC Election)

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Winner List 2024 : कोण आहेत महाराष्ट्राचे २८८ विजयी आमदार; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर…)

विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे. भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. (BMC Election)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.