ओबीसींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार 

93

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी करून तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसींचा अपमान केला होता. त्यांचा आपण निषेध करतो. राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यभर आंदोलन करेल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी, २३ मार्च रोजी सांगितले. ओबीसी समाज राहुल गांधी यांना जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून अपमानास्पद सवाल केला होता. राहुल गांधी यांनी तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसींचा अपमान केला आहे. आपण त्यांचा निषेध करतो. काँग्रेसची जातीयवादी वृत्ती यातून दिसून येते. राहुल गांधी अजूनही राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत असे या वक्तव्यावरून दिसते. तथापि, कोणी कितीही मोठा असला तरी देशाचा कायदा आणि संविधान सर्वात श्रेष्ठ आहे, हे न्यायालयाच्या निर्णयावरून दिसले. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता राहुल गांधी आपणच बळी असल्याचा आव आणू शकत नाहीत. तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी माफी मागणार की नाही आणि न्यायालयाने दिलेली शिक्षा स्वीकारणार की नाही असा आपला सवाल आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून संविधानाचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांच्यावरील शिक्षेची कारवाई केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली हा काँग्रेस नेत्यांचा आरोप न्यायालयाचा अवमान करणारा आहे. जातीयवादी वृत्तीने ओबीसींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला न्यायालयाचा निर्णयही मान्य नाही हे धक्कादायक आहे. न्यायालयाच्या अवमान करण्याबद्दल भाजपा दाद मागेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(हेही वाचा राज ठाकरेंच्या भाषणानंतर सांगलीतील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.