BJP : विधान परिषदेतील आरक्षण पाच टक्क्यांनी वाढविणार

124
Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले...

केंद्र सरकार अनुसूचित जाती आणि जनजातीचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, हा विरोधी पक्षांचा कांगावा खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) हुकमी उपाय शोधून काढण्यात आला आहे. विधान परिषदांमधील आरक्षण पाच टक्क्याने वाढविण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही विधानसभेची निवडणूक लवकरच होणे आहे. अशात, लोकसभेत ज्या मुद्यांचा फटका बसला ते मुद्ये खोडून काढण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे.

(हेही वाचा – Kolkata Doctor Rape Case प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारला झापले)

लोकसभेच्या निवडणुकीत इंडी आघाडीने केंद्र सरकार अनुसूचित जाती आणि जनजातीचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा प्रचार केला होता. याचा भाजपाला (BJP) मोठा फटका बसला. भाजपाला फक्त २४० जागा जिंकता आल्या. अलिकडेच १७ ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा आरक्षण संपविणार आणि घटना बदलणार, असा प्रचार केला होता. या प्रचाराचा भाजपाला फटका बसला.

अशात, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपाय शोधून काढला आहे. आता संघाच्या ज्येष्ठांनी हिरवा कंदील दाखविला तर या उपायाची अंमलबजावणी केली जाणार आहे. केरळमध्ये ३१ ऑगस्ट पासून २ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक होणार आहे. यात या मुद्यावर चर्चा होणार आहे.

(हेही वाचा – Metro 3 च्या १० स्थानकांचे काम पूर्ण; कधी करता येणार भुयारी प्रवास ?)

सूत्रानुसार, राज्यसभा आणि ज्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत तेथे एससी आणि एसटींचे आरक्षण पाच टक्क्याने वाढविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सहा राज्यांत विधान परिषदा आहेत. भाजपा विधान परिषदांत एससी-एसटीसाठी ५ टक्के आरक्षणावर विचार करत आहे.

या राज्यांतील विधान परिषदांमध्ये आरक्षण पाच टक्क्याने वाढविण्याचा प्रस्ताव मांडला जावू शकतो. अनुसूचित जाती-जनजाती आणि आदिवासीयांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून भ्रमाची स्थिती आहे. याचा फटक लोकसभेत बसला. यामुळे हा भ्रम दूर केला गेला नाही तर त्याचा फटका आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही बसण्याची भीती भाजपाला (BJP) आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.