वीर सावरकरांचा अवमान: राहुल गांधींच्या फोटोला भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात मारले जोडे

31

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमानकारक उल्लेख केला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवार, २३ मार्च रोजी विधिमंडळात हा विषय चांगलाच पेटला आणि भाजपच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांनी जे जोडो मारो आंदोलन केले. त्यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार आशिष शेलार, आमदार योगेश सागर यांच्यासह अनेक आमदार हे राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत होते.

राहुल यांनी नववर्षानिमित्त हिंदूंचा अपमान केला

राहुल गांधी यांनी हिंदू नववर्षाच्या दिवशी ज्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तो हिंदूंचा अपमान असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा आदर केला, त्यासाठी लढा दिला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणे म्हणजे हिंदूचा अपमान करणे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांना जोडे मारले आहेत. देशद्रोही राहुल गांधी यांनी देशाची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी, ही आमची मागणी आहे, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.

आता जनाब उद्धव ठाकरेच म्हणावे लागेल

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे, त्यांना काहीही म्हटले तरी फरक पडत नाही. त्यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदराबाबत कोणतीही अपेक्षा ठेवता येणार नाही. आता उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरेच म्हणावे लागेल, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.