महायुतीच्या विजयासाठी BJP सज्ज; Chandrashekhar Bawankule यांची माहिती

93
महायुतीच्या विजयासाठी BJP सज्ज; Chandrashekhar Bawankule यांची माहिती
  • प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यात पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना सज्ज झाली आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी दिली. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

अमित शाह यांनी २५ आणि २५ सप्टेंबर अशा दोन दिवसात विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम आणि उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, या दौर्‍यामध्ये जवळपास पाच हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी शाह यांनी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा. महायुतीचा विजय व्हावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याविषयी शाह यांनी मार्गदर्शन केले.

(हेही वाचा – Fraud : हाफकिनमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली २ जणांची फसवणूक; महिलेवर गुन्हा दाखल)

बूथपातळीवरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात केंद्र आणि राज्य सरकार विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची सूचना शाह यांनी केली आहे. त्यादृष्टीने पक्ष कार्यकर्ते बूथपातळीवर सक्रीय होतील. पक्ष कार्यकर्त्यांनी बूथपातळीपर्यंत सामान्य जनतेशी संपर्क साधावा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, सरकारची चांगली कामगिरी आणि संघटनेची ताकद याच्या जोरावर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणणे, यासाठी अमित शाह यांनी या संघटनात्मक बैठकांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना विजयाचा मंत्र दिल्याचे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

अमित शाह यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांना केलेल्या मागदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे. शाह यांनी संघटन शक्ती मजबूत करण्याच्या आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याचा दिलेल्या मूलमंत्राचे आम्ही पालन करू आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.